Monday, 14 May 2012

Marathi Paul Padate Pudhe - Video Song with Lyrics



Song - Marathi Paul Padate Pudhe
Movie - Maratha Tituka Melavava (1964)
Lyrics - Shanta Shelke
Music - Anandghan (Lata Mangeshkar)
Singers - Lata, Usha, Meena, Hridaynath Mangeshkar, Hemant Kumar

गीत - मराठी पाउल पडते पुढे
चित्रपट - मराठा तितुका मेळवावा (१९६०)
गीतकार - शांता शेळके
संगीत - आनंदघन (लता मंगेशकर)
स्वर - लता, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर, हेमंतकुमार

गीत - खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

Tuesday, 8 May 2012

Gomu Sangatina Majhya Tu Yeshil Kay - Video Song

Song - Gomu Sangteena Majhya Tu Movie - Ha Khel Savlyancha Lyricist - Sudheer Moghe Composer - Hridayanath Mangeshkar Singer - Asha Bhosle, Hemant kumar गीत - गोमु संगतीनं माझ्या तू येशील काय ? चित्रपट - हा खेळ सावल्यांचा गीतकार - सुधीर मोघे संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर गायक - आशा भोसले, हेमंत कुमार Lyrics - गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ? माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ? आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं माझं कालिज भोलं, त्यात मासोली झालं माझ्या पिरतीचा सूटलाय तुफान वारा वारा वारा रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसुद चोरा तुझ्या नजरेच्या जादूला, अशी मी भूलणार नाय रं माझ्या रुपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा खुळा पारधी रं, जाळ्यामंदी आला आला गं तुला रुप्याची नथनी घालीन गं तुला मिरवत मिरवत नेईन तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ? आरं संगतीनं तुझ्या मी येणार ...... हाय

Sunday, 6 May 2012

Sunya Sunya Mahifilit Mazya - Smita Patil - Beautiful Song



Song - Sunya Sunya Maifilit Mazya
Movie - Umbaratha (1977)
Lyrics - Suresh Bhat
Music - Pt. Hridaynath Mangeshkar
Singer - Lata Mangeshkar
Actros - Smita Patil

गीत - सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या
चित्रपट - उंबरठा (१९७७)
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
राग - पटदीप (नादवेध)

गीत - सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !